एका बापाची रोजनिशी
आज ,
तुझ्या आगमनाची बातमी कळाली
मी उड्या मारल्या ,जोरात नाचलो
सर्वाना सांगत सुटलो वेडयासारखा
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज ,
तू बोलू लागलीस ,आई नंतर
पहिला शब्द 'अण्णा' म्हणालीस
आता मी अण्णाचा 'अण्णासाहेब 'झालोय
तरी तुझा पहिला 'अण्णा' विसरलो नाही
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
रांगु लागली ,घरात पसारा करू लागली
माझी पुस्तके फाडू लागली विस्कटू लागली
त्यावेळी मी न रागावता तुझे पराक्रम
जगाला सांगू लागलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू म्हणाली मी 'चालू' अन पटकन
चालू लागली धावू लागली पळू लागली
तुझ्यामागे धावताधावता मी माझे
वय ,प्रतिष्ठ विसरून गेलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू अंगाखांद्यावर खेळू लागली
माझ्या दाढीमिश्या ओढू लागली
तुझी छोटी छोटी पावले
माझ्या छातीवर मारू लागली
मोठ्या पैलवानाशी दोन हात करणारा मी
ह्यावेळी तूझे कौतुक करू लागलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू शिकायला सुरवात केली
खूप तन्मयतेने शिकू लागली
अभ्यासात तू आहेसच हुशार
सर्व जण तुझे कौतुक करू लागले
मला तो माझाच सन्मान वाटला
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तुला शिस्त लागावी म्हणून मारले
वळ तुझ्या हातावर उमटले
पण बळ माझ्या हातातले गेले
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू संगीताची परीक्षा पास झाली
मीच वाटले संगीतकार झालो
असे का वाटले
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू नृत्यातही बक्षीस जिंकले
मी कामावर -गावभर पेढे वाटत नाचत होतो
सांगत होतो ती पहा तीच ती माझी मुलगी
'१' ला नंबर मिळवणारी
मी असा का वागलो
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू सहलीला गेली होतीस
मैत्रीणि बरोबर मजा करीत होतीस
गाणी भेंड्या खेळत होतीस
आणि मी थंडीत कुडकुडत पहाटेपर्यंत
उघड्या मैदानात काळजीने तुझी वाट पाहत होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तुझ्या शिक्षणासाठी माझी तेजस्विता गुंडाळून
अनेकापुढे मला लाचार व्हाव लागतंय
तुझ्या नकळत
मी असा का वागलो
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तु चांगलीच आजारी पडली होतीस
तापाने फणफणली होतीस
मी वरवर कणखरपणा दाखवून
आतून मात्र ढासळलो होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तु मोठी झाली आहेसं म्हणून
मला पटत नसतानाही काही बंधने
तुझ्यावर व माझ्यवर ठेवावी लागत आहेत
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू मला उलटे बोलू लागली आहेस
माझा अपमान करू लागली आहेस
त्यामुळे माझ काळीज चिरत चाललीय
कसे ?
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू रागावून उपाशी झोपलीस
पण मी पोटभर जेवूनसुद्धा माझ्या
पोटात कावळे ओरडत होते
असे कसे ?
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू उपाशी झोपल्यामुळे उरलेले अन्न
फेकून द्यावे लागले
त्यावेळी माझ्या कष्ट करी मनाला
किती वेदना झाल्या
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू काकाकडे रहायला जायचे म्हणालीस
मी तोंडाने ' खुशाल जा ' म्हणतोय
पण आतून ढसाढसा रडतोय
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू खेळण्यात पटाईत झालीस
सराईत झालीस
लहानपणी मी मुद्दाम हरायचो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशियाय
आज
तू शिक्षण पूर्ण केलस
माझ्यापेक्षाही जास्त शिकलीस
विद्यापीठाने तुझा गौरव केला
पण मला तो माझाच गौरव वाटला
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू सासरी निघालीस
आईच्या कुशीत जावून रडू लागलीस
आतून कोसळलेला मी यावेळी सुद्धा
तुला हसवण्याचा केविलवाणा
प्रयत्न करत होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आता
तू संसारात रमलीस
तूझ्या सासरचे ,नवऱ्याचे ,मुलाबाळाचे
करण्यात रमून गेलीस
तरीही तुझा 'अण्णा' चातकासारखा
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतोय
तू येणार नसली तरीही
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज ,
तुझ्या आगमनाची बातमी कळाली
मी उड्या मारल्या ,जोरात नाचलो
सर्वाना सांगत सुटलो वेडयासारखा
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज ,
तू बोलू लागलीस ,आई नंतर
पहिला शब्द 'अण्णा' म्हणालीस
आता मी अण्णाचा 'अण्णासाहेब 'झालोय
तरी तुझा पहिला 'अण्णा' विसरलो नाही
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
रांगु लागली ,घरात पसारा करू लागली
माझी पुस्तके फाडू लागली विस्कटू लागली
त्यावेळी मी न रागावता तुझे पराक्रम
जगाला सांगू लागलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू म्हणाली मी 'चालू' अन पटकन
चालू लागली धावू लागली पळू लागली
तुझ्यामागे धावताधावता मी माझे
वय ,प्रतिष्ठ विसरून गेलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू अंगाखांद्यावर खेळू लागली
माझ्या दाढीमिश्या ओढू लागली
तुझी छोटी छोटी पावले
माझ्या छातीवर मारू लागली
मोठ्या पैलवानाशी दोन हात करणारा मी
ह्यावेळी तूझे कौतुक करू लागलो
का ?…
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू शिकायला सुरवात केली
खूप तन्मयतेने शिकू लागली
अभ्यासात तू आहेसच हुशार
सर्व जण तुझे कौतुक करू लागले
मला तो माझाच सन्मान वाटला
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तुला शिस्त लागावी म्हणून मारले
वळ तुझ्या हातावर उमटले
पण बळ माझ्या हातातले गेले
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू संगीताची परीक्षा पास झाली
मीच वाटले संगीतकार झालो
असे का वाटले
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू नृत्यातही बक्षीस जिंकले
मी कामावर -गावभर पेढे वाटत नाचत होतो
सांगत होतो ती पहा तीच ती माझी मुलगी
'१' ला नंबर मिळवणारी
मी असा का वागलो
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू सहलीला गेली होतीस
मैत्रीणि बरोबर मजा करीत होतीस
गाणी भेंड्या खेळत होतीस
आणि मी थंडीत कुडकुडत पहाटेपर्यंत
उघड्या मैदानात काळजीने तुझी वाट पाहत होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तुझ्या शिक्षणासाठी माझी तेजस्विता गुंडाळून
अनेकापुढे मला लाचार व्हाव लागतंय
तुझ्या नकळत
मी असा का वागलो
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तु चांगलीच आजारी पडली होतीस
तापाने फणफणली होतीस
मी वरवर कणखरपणा दाखवून
आतून मात्र ढासळलो होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तु मोठी झाली आहेसं म्हणून
मला पटत नसतानाही काही बंधने
तुझ्यावर व माझ्यवर ठेवावी लागत आहेत
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू मला उलटे बोलू लागली आहेस
माझा अपमान करू लागली आहेस
त्यामुळे माझ काळीज चिरत चाललीय
कसे ?
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू रागावून उपाशी झोपलीस
पण मी पोटभर जेवूनसुद्धा माझ्या
पोटात कावळे ओरडत होते
असे कसे ?
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू उपाशी झोपल्यामुळे उरलेले अन्न
फेकून द्यावे लागले
त्यावेळी माझ्या कष्ट करी मनाला
किती वेदना झाल्या
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू काकाकडे रहायला जायचे म्हणालीस
मी तोंडाने ' खुशाल जा ' म्हणतोय
पण आतून ढसाढसा रडतोय
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू खेळण्यात पटाईत झालीस
सराईत झालीस
लहानपणी मी मुद्दाम हरायचो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशियाय
आज
तू शिक्षण पूर्ण केलस
माझ्यापेक्षाही जास्त शिकलीस
विद्यापीठाने तुझा गौरव केला
पण मला तो माझाच गौरव वाटला
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आज
तू सासरी निघालीस
आईच्या कुशीत जावून रडू लागलीस
आतून कोसळलेला मी यावेळी सुद्धा
तुला हसवण्याचा केविलवाणा
प्रयत्न करत होतो
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
आता
तू संसारात रमलीस
तूझ्या सासरचे ,नवऱ्याचे ,मुलाबाळाचे
करण्यात रमून गेलीस
तरीही तुझा 'अण्णा' चातकासारखा
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसतोय
तू येणार नसली तरीही
का?….
तुला नाही कळणार
बाप झाल्याशिवाय
Almost cried
ReplyDelete